सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

छान छान गोष्टी भाग 28दि.27/08/2021

वाचा रे वाचा!

🎧 खालील नंबर वर मिस्ड कॉल द्या व गोष्ट ऐका. Smart Phone ची गरज नाही.
 TOLL FREE NUMBER 
              📞 8033094243




       शुक्रवार दि.27/08/2021

सर्वोत्तम पाणी

 एक दिवस, अकबरने सर्व दरबाऱ्यांना एक प्रश्न विचारला - ‘कोणत्या नदीचे पाणी हे सर्वात उत्तम आहे?’

दरबारातील जास्तीत जास्त लोकांनी एकमताने उत्तर दिले, ‘महाराज! इतर सर्व नदयांच्या पाण्याच्या तुलनेत गंगा नदीचे पाणी हे सर्वोत्तम पाणी आहे.’

परंतु बिरबल शांत होता. हे अकबरने बघितले आणि विचारले, ‘तू शांत का बसला आहे बिरबल? तू माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही.’ 

बिरबल बोलला, ‘महाराज सर्व नदयांमध्ये यमुना नदीचे पाणी सर्वोत्तम आहे.’

बिरबलचे हे उत्तर ऐकून अकबर चकित झाला. तो बोलला, ‘बिरबल हे तू काय बोलतो आहे? तुमच्या धार्मिक पुस्तकात गंगा नदी ही शुध्द व पवित्र म्हटले आहे, आणि तू यमुनेचे पाणी उत्तम म्हणत आहेस!’

बिरबल म्हणाला, ‘महाराज! मी गंगा नदीच्या पाण्याला अमृत मानतो. त्यामुळे तुम्ही कृपया इतर कोणत्याही पाण्याबरोबर त्याची तुलना करू नका. ते तर अमृत आहे. राहिला प्रश्न नदीच्या पाण्याचा, तर आपल्या राज्याची यमुना नदीच स्वच्छ आहे व त्याचेच पाणी सर्वोत्तम आहे.’

सर्व दरबारी व अकबर अनुत्तरीत झाले व बिरबलच्या उत्तराशी सहमत झाले.

'ROOM TO READ' उपक्रमांतर्गत गोष्ट  वाचूया व ऐकूया...

अक्षता अशोक खरुडे

रूम टू रीड - लायब्ररी कोच

सादर करत आहेत आजची गोष्ट......

नमस्कार, दि. ८ सप्टेंबर "आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाचं" औचित्य साधून "रूम टू रीड इंडिया ट्रस्ट" च्या वतीने दिनांक १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन ते ८ सप्टेंबर साक्षरता दिन या  कालावधीत मुलांसाठी "वाचन मोहीम (Reading Campaign)" आयोजित करण्यात येत आहे. दररोज  मुलांसाठी आपल्या ग्रुप वर एक मजेदार डिजिटल वाचन साहित्य पाठवले जाईल. सर्व मुलांनी, पालकांनी तसेच शिक्षकांनी वाचनाचा भरभरून आनंद घेऊया. रोज अर्धा तास वाचनात रममाण होऊया. वाचन करताना  आलेले अनुभव आणि  आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात तसेच पालकांच्या मदतीने गोष्टीवर आधारित वाचन उपक्रम करून आपल्या ग्रुपवर पाठवावेत  ही नम्र विनंती. धन्यवाद!

📕 आजच्या गोष्टीचे नाव : बूट आणि मोजे

खालील गोष्टीचा Video पहा व ऐका.


📢 आज पाठवलेल्या पुस्तकावर खाली प्रश्न दिले आहेत. 

📢 तुमच्या इयत्तेनुसार खाली दिलेली activity करून ग्रुपवर पाठवा.

🔺️ इयत्ता १ली व २री 

तुमच्याकडे कोणकोणत्या रंगाचे मोजे आहेत ते पालकांच्या मदतीने लिहा व त्यांचे चित्र काढा.

🔺️ इयत्ता ३री ते ५वी 

तुमच्या घरातील अशा कोणत्या टाकाऊ वस्तू आहेत ज्यांचा तुम्ही वेगळ्या कामासाठी उपयोग केला आहे ते लिहा.

      THANKS FOR VISIT 

Previous
Next Post »