सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

छान छान गोष्टी भाग 27दि.26/08/2021

वाचा रे वाचा!

🎧 खालील नंबर वर मिस्ड कॉल द्या व गोष्ट ऐका. Smart Phone ची गरज नाही.
 TOLL FREE NUMBER 
              📞 8033094243




       गुरूवार दि.26/08/2021

सर्वात मोठे शस्त्र

 बादशहा अकबर आणि बिरबल मध्ये कधी कधी अशा गोष्टींवरही चर्चा होत असे की ज्याची कसोटी घेताना जिवाचा धोका उद्भवत असे. एकदा अकबरने बिरबलला विचारले - ‘बिरबल, जीवनामध्ये सर्वात मोठे शस्त्र कोणते आहे?’

‘महाराज जीवनात सर्वात मोठे शस्त्र हे आत्मविश्वास आहे.’ बिरबलने उत्तर दिले.

अकबरने बिरबलचे हे उत्तर ऐकून आपल्या मनात ठेवले व एखादया वेळी आपण याची परीक्षा घेऊ असे ठरविले.

एके दिवशी, एक हत्ती वेडा झाला. अशा स्थितीत त्या हत्तीला बेडयांमध्ये अडकवून ठेवले जात असे. 

अकबरने बिरबलच्या आत्मविश्वासाची परीक्षा घेण्यासाठी त्याला बोलवणे पाठवले व इकडे हत्तीच्या महावताला आदेश दिला की जसा बिरबल येताना दिसेल, तसा तू या हत्तीच्या बेडया काढून टाक.

बिरबलला या गोष्टीची जराही कल्पना नव्हती. जेव्हा बिरबल अकबरला भेटण्यासाठी दरबाराकडे जात होता तेव्हा त्याच्या दिशेने तो वेडा झालेला हत्ती सोडला गेला. बिरबल आपल्या स्वतःच्याच धुंदीत चालत होता की त्याची नजर त्या वेडया हत्तीकडे गेली जो उडया मारत त्याच्याकडे येत होता.

बिरबल हजर जबाबी, अतिशय बुध्दिमान, चतुर व आत्मविश्वासी होता. त्याला लगेच लक्षात आले की अकबरने माझ्या आत्मविश्वासाची व बुध्दिची परीक्षा घेण्यासाठी त्या वेडया हत्तीला माझ्यावर सोडले आहे. 

तो हत्ती सोंड वर करून खूप जोरात बिरबलच्या दिशेने पळत येत होता. बिरबल अशा ठिकाणी उभा होता की तो इकडे तिकडे पळून सुध्दा वाचणे शक्य नव्हते. त्याच वेळेला बिरबलला एक कुत्रा दिसला. हत्ती खूप जवळ आला होता. तो इतक्या जवळ होता की कोणत्याही क्षणी बिरबलला आपल्या सोंडेत पकडले असते.

तेव्हा बिरबलने तात्काळ त्या कुत्र्याचे मागचे दोन पाय पकडले आणि पूर्ण ताकदीने त्याला फिरवून हत्तीच्या दिशेने फेकले. अत्यंत घाबरलेला व ओरडत असलेला कुत्रा जेव्हा हत्तीवर जाऊन आपटला तेव्हा त्याचे ते भयानाक किंचाळणे व ओरडणे ऐकून हत्ती पण घाबरला व वळून दुसऱ्या दिशेला पळाला.

अकबरला जेव्हा बिरबलने केलेल्या या कृत्याची बातमी मिळाली तेव्हा अकबरला मानावेच लागले की बिरबल जे काही बोलला ते अगदी योग्य आहे. आत्मविश्वासच सर्वात मोठे शस्त्र आहे.

'ROOM TO READ' उपक्रमांतर्गत गोष्ट  वाचूया व ऐकूया...

अक्षता अशोक खरुडे

रूम टू रीड - लायब्ररी कोच

सादर करत आहेत आजची गोष्ट......

नमस्कार, दि. ८ सप्टेंबर "आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाचं" औचित्य साधून "रूम टू रीड इंडिया ट्रस्ट" च्या वतीने दिनांक १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन ते ८ सप्टेंबर साक्षरता दिन या  कालावधीत मुलांसाठी "वाचन मोहीम (Reading Campaign)" आयोजित करण्यात येत आहे. दररोज  मुलांसाठी आपल्या ग्रुप वर एक मजेदार डिजिटल वाचन साहित्य पाठवले जाईल. सर्व मुलांनी, पालकांनी तसेच शिक्षकांनी वाचनाचा भरभरून आनंद घेऊया. रोज अर्धा तास वाचनात रममाण होऊया. वाचन करताना  आलेले अनुभव आणि  आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात तसेच पालकांच्या मदतीने गोष्टीवर आधारित वाचन उपक्रम करून आपल्या ग्रुपवर पाठवावेत  ही नम्र विनंती. धन्यवाद!

📕 आजच्या गोष्टीचे नाव : Indian Funnel Cake 

📢 आजची गोष्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(वहीची किंवा पुस्तकाची पाने बोटाने जशी उलटवतो.तशीच Flipbook ची पाने उलटवा व वाचनाचा आनंद घ्या.)

📢 तुमच्या इयत्तेनुसार खाली दिलेली activity करून ग्रुपवर पाठवा.

🔺️ इयत्ता १ली व २री 

तुम्हांला आवडणारे एखादे मुखवटे पालकांच्या मदतीने तयार करा आणि मुखवटा लावलेला तुमचा फोटो ग्रुपवर पाठवा.

🔺️ इयत्ता ३री ते ५वी 

तुम्ही जत्रेत फिरायला गेला असालच. तुमचा अनुभव लिहा व चित्र सुद्धा काढा.

      THANKS FOR VISIT 

Previous
Next Post »