![]() |
| वाचा रे वाचा! |
कोंबडीचे अंडे
बऱ्याच वर्षांच्या अनुभवावरून अकबरला हे माहिती होते की बिरबलची मजाक करणे सोपी गोष्ट नाही. तरीसुध्दा अकबर स्वतःला थांबवू शकत नसे व कधीकधी बिरबलची मजाक करत असे.
एके दिवशी बिरबल दरबारात येण्यापूर्वी अकबरने दरबारातील सर्व दरबाऱ्यांना एक एक कोंबडीचे अंडे दिले व त्यांना बिरबला बरोबर करण्याच्या गंमती बद्दल योजन सांगितली.
नेहमीप्रमाणे जेव्हा बिरबल दरबारात आला तेव्हा अकबर त्याला म्हणाला, ‘काल रात्री मला एक स्वप्न पडले त्यात एका ऋषींनी मला सांगितले की, जे दरबारी बागेतील तलावात जातील व तलावातून आपल्या बरोबर हातात अंडे घेऊन येईल तेच माझ्यासाठी निष्ठावंत असतील. तरी आता सर्वांनी तलावात जाऊन त्यातून एक एक अंडे आणावे.’
त्यानुसार, सर्व दरबाऱ्यमधून एक एक दरबारी तलावातील पाण्यात डुबकी मारून आपल्या बरोबर एक अंडे घेऊन बाहेर येत होते. शेवटी आता बिरबलचा नंबर होता.
बिरबलने तलावात उडी मारली परंतु अंडे सापडण्यात तो अयशस्वी झाला. त्याला त्वरीत लक्षात आले की ही अकबरची माझ्यासोबत गंमत करण्याची योजना आहे.
बिरबल तलावाच्या बाहेर येताच कोंबडयाच्या आवाजात ओरडु लागला. कोंबडयाच्या त्या आवाजामुळे अकबर संतप्त झाला. तो बोलला, ‘तू वेडा झाला आहेस का? तलावातून प्रत्येक जण आपल्या सोबत अंडे घेऊन आला परंतु तुझ्या हातात अंड नाही. असे का?’
बिरबल बोलला ‘महाराज! फक्त कोंबडयाच अंडे घालू शकतात. मी तर कोंबडा आहे.’
अकबरने दरबाऱ्यांकडे बघितले व चोरून हसला. व दरबाऱ्यांनी गोंधळून आपले हात एकमेकांवर मारले.
'ROOM TO READ' उपक्रमांतर्गत गोष्ट वाचूया व ऐकूया...
अक्षता अशोक खरुडे
रूम टू रीड - लायब्ररी कोच
सादर करत आहेत आजची गोष्ट......
नमस्कार, दि. ८ सप्टेंबर "आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाचं" औचित्य साधून "रूम टू रीड इंडिया ट्रस्ट" च्या वतीने दिनांक १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन ते ८ सप्टेंबर साक्षरता दिन या कालावधीत मुलांसाठी "वाचन मोहीम (Reading Campaign)" आयोजित करण्यात येत आहे. दररोज मुलांसाठी आपल्या ग्रुप वर एक मजेदार डिजिटल वाचन साहित्य पाठवले जाईल. सर्व मुलांनी, पालकांनी तसेच शिक्षकांनी वाचनाचा भरभरून आनंद घेऊया. रोज अर्धा तास वाचनात रममाण होऊया. वाचन करताना आलेले अनुभव आणि आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात तसेच पालकांच्या मदतीने गोष्टीवर आधारित वाचन उपक्रम करून आपल्या ग्रुपवर पाठवावेत ही नम्र विनंती. धन्यवाद!
📕 आजच्या गोष्टीचे नाव :लहान आणि मोठा
खालील गोष्टीचा Video पहा व ऐका.
📢 आज पाठवलेल्या पुस्तकावर खाली प्रश्न दिले आहेत.
📢 तुमच्या इयत्तेनुसार खाली दिलेली activity करून ग्रुपवर पाठवा.
🔺️ इयत्ता १ली व २री
तुम्ही कोणकोणती कामे स्वतः करता हे व्हिडीओ करून सांगा.
🔺️ इयत्ता ३री ते ५वी
तुम्हांला कधी कोणी 'तू लहान आहेस, तू मोठा झाला आहेस' असे म्हटले असेलच. तर ते असे कोणत्या गोष्टीसाठी आणि कोण म्हणाले ते लिहा.
THANKS FOR VISIT

ConversionConversion EmoticonEmoticon