सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

छान छान गोष्टी भाग 20दि.18/08/2021

वाचा रे वाचा!

🎧 खालील नंबर वर मिस्ड कॉल द्या व गोष्ट ऐका. Smart Phone ची गरज नाही.
 TOLL FREE NUMBER 
              📞 8033094243




       बुधवार दि.18/08/2021

कावळा आणि कुत्रा

एकदा एका कावळ्याने सटवाईला काही वस्तू अर्पण करण्याचे ठरविले. त्यासाठी कुत्र्याला त्याने आपल्याबरोबर येण्याची विनंती केली. कुत्रा म्हणाला, 'देवीला तुझा इतका कंटाळा आहे की, तू दिलेल्या वस्तूंचा ती मुळीच स्वीकार करणार नाही.'

यावर कावळा म्हणाला, 'अरे, यासाठीच तर मी तिला वस्तू भेट देण्याचं ठरविलं आहे. तिचा माझ्यावरचा रोष दूर व्हावा आणि तिनं माझं कल्याण करावं या हेतूनेच मी तिला या वस्तू अर्पण करणार आहे.'

तात्पर्य - देव आपल्याला प्रसन्न होईल म्हणून देवीची पूजा करणारे खूप असतात. खर्‍या भक्तिभावाने देवाला पूजणारे थोडेच.

'ROOM TO READ' उपक्रमांतर्गत गोष्ट  वाचूया व ऐकूया...

अक्षता अशोक खरुडे

रूम टू रीड - लायब्ररी कोच

सादर करत आहेत आजची गोष्ट......

नमस्कार, दि. ८ सप्टेंबर "आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाचं" औचित्य साधून "रूम टू रीड इंडिया ट्रस्ट" च्या वतीने दिनांक १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन ते ८ सप्टेंबर साक्षरता दिन या  कालावधीत मुलांसाठी "वाचन मोहीम (Reading Campaign)" आयोजित करण्यात येत आहे. दररोज  मुलांसाठी आपल्या ग्रुप वर एक मजेदार डिजिटल वाचन साहित्य पाठवले जाईल. सर्व मुलांनी, पालकांनी तसेच शिक्षकांनी वाचनाचा भरभरून आनंद घेऊया. रोज अर्धा तास वाचनात रममाण होऊया. वाचन करताना  आलेले अनुभव आणि  आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात तसेच पालकांच्या मदतीने गोष्टीवर आधारित वाचन उपक्रम करून आपल्या ग्रुपवर पाठवावेत  ही नम्र विनंती. धन्यवाद!

आज पाठवलेल्या पुस्तकावर खाली प्रश्न दिले आहेत तुमच्या इयत्तेनुसार जी activity दिली गेली आहे ती करून ग्रुपवर पाठवा.

📢 तुमच्या इयत्तेनुसार खाली दिलेली activity करून ग्रुपवर पाठवा.

🔺️ इयत्ता १ली व २री 

गोष्टीत कोणकोणते प्राणी आहेत त्यांची पालकांच्या मदतीने नावे लिहा.

🔺️ इयत्ता ३री ते ५वी 

कावळ्याने तुटलेला पतंग माकडाला का आणून दिला 

असेल बरं? तुम्ही कावळ्याच्या जागी असता तर काय केले असते?

📕 आजच्या गोष्टीचे नाव : Bandar Ki Patang

📢 आजची गोष्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(वहीची किंवा पुस्तकाची पाने बोटाने जशी उलटवतो.

 तशीच Flipbook ची पाने उलटवा व वाचनाचा आनंद घ्या.)

Previous
Next Post »