सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Plastic Poem by Digvijay Sangale

 


जागतिक प्लास्टिक दिवसानिमित्त काव्यरचना...

शनिवार दिनांक 03/07/2021


🖱️ प्लास्टिक 🖱️


प्लास्टिक माझे नाव

माझा तुम्हीच वाढवला भाव 

         जाड पातळ माझी जात      

         करा अडचणींवर मात 

साधारण मला समजू नका

मला वापरतो सारा गाव 

माझा तुम्हीच वाढवला भाव ||

      आकार माझा लहान मोठा              

       समजा दूरगामी तोटा

अधिन माझ्या होऊ नका

 बुडेल तुमची नाव 

माझा तुम्हीच वाढवला भाव ||

    करण्यास मला नष्ट 

    घेतले अनेकांनी कष्ट

नका लागू माझ्या नादा 

आधी पर्याय मला शोधा

बुद्धिमान  रंक आणि राव 

माझा तुम्हीच वाढवला भाव ||

लास्टिक माझे नाव

माझा तुम्हीच वाढवला भाव ||

          रचना- दिग्विजय सांगळे

Previous
Next Post »