स्फुट
मातीचा गोळा
दिधला कुंभारा
सांगितलं त्याला
मडकी आकारा..
कुंभाराने मातीचा
एकजीव केला
चाकावर ठेवून
आकार देऊ लागला.
कधी कधी तो
मारू लागला थाप
तोवर आली
कायद्याची धाक.
कायदा सांगे कुंभारा
नको मारू थाप
नको देऊ तु त्रास
कर तू कमाल
कुंभाराने कच्ची बच्ची
मडकी तयार केली.
आव्यात घालण्याअगोदर
मडकी पुढच्या घरी गेली. .
भविष्यात मडक्याचा
प्रश्न पडला कुंभारा...
जगाच्या शर्यतीत
मडकं येईल का आकारा?
अर्ध्या कच्च्या तयारीने
मडके जाईल फुटुन
मेहनत कुंभाराची
फळा येईल कोठून?
शिक्षणाची अवस्था
राहिली नाही त्या आस
जो शिकला तोही पास,
नाही शिकला तोही पास.
©® Dnyandeo Sutar
Bhadkambe
मोबाईल 8007921434
3 comments
Click here for commentsNice
ReplyThank you so much.
Replyबहुत सुन्दर
ReplyConversionConversion EmoticonEmoticon