हिंदुस्तान माझा
हिंदुस्तान माझा असे देश हो
हिंदुस्तानीयों.................
धर्म भाषा विविधतेने नटलेला
संस्कृतीचा वसा जपलेला
मानवतेशी नातीगोती जपते इथली माती
दयावान इथली प्रजा हो...............
ही भूमी क्रांतिकारकांची
पाने रंगली इतिहासाची
स्वातंत्र्याची शपथ घेऊनी मृत्यूशी झुंजले
परकियांचा कडेलोट केला हो.............
काश्मीर ते कन्याकुमारी
गजबजली शहर सारी
विज्ञानाची कास धरूनी चंद्रावर जाती
मंगळावर यान गेले हो..................
गड किल्ले सागरसंपत्ती
व्यर्थ न जाते इथली माती
अखंडतेचा नारा पिटुनी सीमेवर रक्त सांडुनी
तिरंग्याला त्रिवार सलाम हो...............
दिग्विजय कृष्णाजी सांगळे
कुर्ला, मुंबई
९८२११८७४३०
ConversionConversion EmoticonEmoticon