सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Ganesh Nikam's poem


१६ जानेवारी १६८१छत्रपती संभाजीराजे राज्याभिषेक दिन

कविता: संभाजी राजे

मोडेन पण वाकणार नाही

हाच माझ्या छत्रपतींचा बाणा

मरण पत्करले संभाजीने पण

दिला नाही दुष्मनास ठावठिकाणा 


लढतीत १२०युद्धे सारी

ती ही न पत्करता हार

पाहून  गनिमी कावा राजांचा

शत्रूही झाली सारी बेजार.


महान योद्धा आमचा हा

राहिला आमच्याकडून उपेक्षित

१४व्या वर्षी बुद्धभूषण ग्रंथ 

 लिहिला होते का हे अपेक्षित?


प्रतिभावंत छत्रपती संभाजी राजे

होती साहित्याची त्यांना जाण

नायिकाभेद नखशिख सातसतक

बुधभूषण ग्रंथ लिहिलेत छान.


मरणप्राय यातना स्वराज्यासाठी

केल्या असतील कशा सहन?

शरणागती पत्करली नाही

समोर असतांनाही दहन


इंद्रायणी रडू लागली अखेर

पाहून आमच्या छत्रपतीचे हाल

तरीही मागे हटलाच नाही

आमच्या शिवाजी राजांचा लाल


कवी: गणेश रामदास निकम सर

चाळीसगाव गणेशपूर

मो..न.७०५७९०४६७७

९८३४३६१३६४

१६/१/२०२१


Previous
Next Post »