सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

छान छान गोष्टी 110 दि.15/12/2021

 

    छान छान गोष्टी भाग 110

वाचा रे वाचा!






       बुधवार दि.15/12/2021

उपदेश

एकदा गौतम बुद्ध भ्रमण करीत एका गावात आले. त्‍या गावातील मुख्‍य व्‍यक्ती बुद्धांना पसंत करत नसे. जेव्‍हा त्‍याला माहिती झाले की, बुद्ध आपल्‍या शिष्‍यांसोबत गावात येत आहे तेव्‍हा त्‍याने गावातील लोकांना आदेश दिला की, आपल्‍या घराची दारे बंद ठेवा आणि बुद्धांना भिक्षा देऊ नका. बुद्ध त्‍या व्‍यक्तिच्‍या स्‍वभावाला ओळखून होते. मार्गात जेव्‍हा त्‍याचे घर आले तेव्‍हा ते दरवाजात उभे राहून भिक्षा मागू लागले. बुद्धांचा आवाज ऐकून तो मुख्‍य व्यक्ती नाराज झाला आणि म्‍हणू लागला,’’ तुम्‍ही येथून निघून जा, कामधंदा काही करत नाही आणि भिक्षा मागून पोट भरता. कष्‍टाचे काम करायला शिका आणि पोट भरा.’’ बुद्ध गुपचुप त्‍याचे अपमानास्‍पद बोलणे ऐकत होते. त्‍याचे बोलणे संपल्‍यावर बुद्ध म्‍हणाले,’’ माझ्या एका शंकेचे आपण समाधान करा. आपल्‍या घरी येऊन जर काही खाण्‍यासाठी मागत असेल, आपण ताट सजवून आणले मात्र त्‍यानंतरही तो ते न स्‍वीकारताच निघून गेला तर तुम्‍ही त्‍या खाद्यपदार्थाचे काय कराल?’’ ती व्‍यक्ती म्‍हणाली,’’ मी ते नष्‍ट करणार नाही आणि घरात ठेवून देईन’’ तेव्‍हा बुद्ध म्‍हणाले,’’ त्‍या दशेनुसार आपले सामान आपल्‍याजवळच राहिले ना? त्‍याचप्रमाणे आपल्‍या घरी येऊन आम्‍ही भिक्षा मागितली आणि बदल्‍यात आपण आम्‍हाला अपशब्‍द वापरले. भिक्षेत दिलेले हे शब्‍द आम्‍ही अस्‍वीकार केले. त्‍यामुळे ते तुमच्‍याजवळच राहिले.’’ मुख्‍य व्‍यक्तीला आपली चूक उमगून आली. बुद्धांची त्‍याने क्षमा मागितली. तो त्‍यांचा शिष्‍य बनला. 

तात्‍पर्य- उग्रपणाने वागल्‍यास होणा-या कामात अडथळा निर्माण होतो आणि संयमाने वागल्‍यास न होणारे कामसुद्धा पटकन होऊन जाते. 

'ROOM TO READ' उपक्रमांतर्गत गोष्ट  वाचूया व ऐकूया...

अक्षता अशोक खरुडे

रूम टू रीड - लायब्ररी कोच

सादर करत आहेत आजची गोष्ट......

दररोज  मुलांसाठी आपल्या ग्रुपवर एक मजेदार डिजिटल वाचन साहित्य पाठवले जाईल. सर्व मुलांनी, पालकांनी तसेच शिक्षकांनी वाचनाचा भरभरून आनंद घेऊया. रोज अर्धा तास वाचनात रममाण होऊया. वाचन करताना  आलेले अनुभव आणि  आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात तसेच पालकांच्या मदतीने गोष्टीवर आधारित वाचन उपक्रम करून आपल्या ग्रुपवर पाठवावेत  ही नम्र विनंती. धन्यवाद!

📕 आजच्या गोष्टीचे नाव : छुई पुई  Two Little Matchsticks 

📢 आजची गोष्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

👉 सूचना : वहीची किंवा पुस्तकाची पाने बोटाने जशी उलटवतो.तशीच Flipbook ची पाने उलटवा व वाचनाचा आनंद घ्या.

      THANKS FOR VISIT 

https://msahitymanch.blogspot.com



Previous
Next Post »